
जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहतो आहे. प्रशासन आरोपींच्या मुसक्या आवळ्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. अशातच शुक्रवार (ता.५) च्या रात्री एका अलिशान कारमधून अवैध दारूची तस्करी असल्याची माहिती गोपनीय पथकाला मिळाली. त्यावरून कारवाई करण्यात आली. या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान कारचालक पसार होण्यात यशस्वी झाला.
कळंब मार्गे राळेगावकडे चारचाकी वाहनामध्ये अवैद्यरीत्या विना परवाना देशी दारूची विक्री करीता वाहतुक करीत आहे. वसंत जिनिंग पॉईट राळेगावयेथे पोलिस थांबून असतांना कळंबकडून एक लाल रंगाची चारचाकी गाडी येतांना दिसली. पोलिस येत असल्याची चाहूल लागताच गाडी चालक हा अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेला त्याचा पोलिसांनी पाठलाग केला असता
तो मिळून आला नाही. एक लाल रंगाची गाडी FIAT PUNTO कंपनीची
क्रमांक MH-40-AC-7260 दिसलीझडती घेतली असता खाकी पृष्ठाचे 18 बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये 48 देशीदारू गोवा नं. 1 संत्रा कंम्पनीचे 180 एम.एल. क्षमतेचे असे एकूण 864 नग
पव्वे प्रत्येकी किंमत 70/- रू प्रमाणे एकुन किंमत 60,480/- रूपयांचा देशी
दारूचा मुद्देमाल अवैद्यरित्या विनापरवानाविक्री करीता वाहतुक करतांना मिळुन आला. व एक जुनी वापरती लाल रंगाची गाडी FIAT PUNTO कंपनीची क्रमांक MH-40-AC-7260 किंमत अंदाजे 2,00,000 रू. असा एकूण 2,60,480 रू. मुद्देमाल मिळून आला. त्यापैकी एक 180 एम. एल. क्षमतेचा देशीदारूचा पव्वा वेगळा काढुन त्यावर पंचाचे व आमचे सहीचे कागदी लेबल लावुन लाखेने पोस्टेचे सिलने सिलबंद करून रासायणीक परीक्षणा राखुन ठेवुन उर्वरीत मुद्देमाल जप्तीपंचणाम्या प्रमाणे पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. सदरचा जप्ती पंचणामा आज दि. 05/07/2024 रोजी 00/20 वा. सुरू करून 00/50 वा. संपविण्यात आला.
