
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीमान बाबारावजी निम्रड यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.श्रीमान बाबारावजी निम्रड यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमान प्रफुल्लभाऊ मानकर यांनी केक भरविला व शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केले,त्यावेळी सहकार क्षेत्राचे नेते श्रीमान प्रफुल्लभाऊ मानकर,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीमान मिलिंदभाऊ ईंगोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीमान राजूभाऊ तेलंगे, श्रीमान अंकुशभाऊ मुनेश्वर,श्रीमान पुरूषोत्तमभाऊ चिडे,श्रीमान किशोर धामंदे,श्रीमान मंगेश राऊत,श्रीमान दिलीप कन्नाके ईत्यादि मान्यवर उपस्थित होते,उपस्थित मान्यवरांनी श्रीमान बाबारावजी निम्रड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यावेळी खरेदी विक्री संघाकडून सुद्धा श्रीमान मिलिंदभाऊ ईंगोले, यांनी शाल व श्रीफळ देऊन श्रीमान निम्रड साहेबांचा यांना सन्मानित केले.
