
तीन दुचाकी चोरटे पोलिसांच्या तावडीत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
आज दि २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास वणी तालुक्यातील ३ दुचाकी चोरटे वडकी येथे बसस्थानक परिसरात चोरीची दुचाकी विकण्यासाठी वावरत असल्याचे वडकी पोलिसांना गोपनीय महितीद्वारे आढळले,वडकी येथील पोलीस कर्मचारी अविनाश चिकराम हे आज सकाळच्या सुमारास वडकी बिट परीसरात पेट्रोलीग करीत असतांना वडकी येथील कालु भंगार यांचे दुकानाजवळ एक सशंयीत युवक स्कुटी घेवुन उभा दिसला.पोलिसांनी सदर युवकाजवळ जावुन नाव गाव विचारले असता तो युवक त्याचे जवळ असलेली स्कुटी क्र. एम. एच 34 ए. डी 2608 सदर ठिकाणी टाकुन पळुन गेला वरुन पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग करुन पकडले व त्याला विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव गुरुदेव गजानन राऊत वय 19 वर्ष रा. मारेगाव असे सांगीतले व त्याला पळुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगीतले की, दि.२७ सप्टेंबर रोजी चे रात्री १२ वा. दरम्यान त्याचे दोन साथीदार जय गजानन पाल रा, मागरुळ व गौरव शंकर थेरे रा. मांगरुळ ता. मारेगाव यांचेसह स्कुटी (मो.सा) क्र. एम. एच 34 ए. डी 2608 गणेशपुर कायर रोड वणी येथुन चोरी करुन गाडी विक्री करण्यासाठी तिघेही वडकी येथे आलो आहे असे सांगीतले वरुन त्याचे दोन साथीदार कुठे आहे असे विचारले असता त्यांनी सांगीतले की, 1)जय गजानन पाल रा. मागरुळ व २) गौरव शंकर थेरे रा. मांगरुळ हे दोघेही वडकी येथील राळेगाव चौफुलीवर असलेल्या उडानपुलाखाली आहे सांगीतले पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या दोघानाही ताब्यात घेतले व गुरुदेव गजानन राऊत वय-19 रा. मारेगाव 2)जय गजानन पाल रा. मागरुळ 3) गौरव शंकर थेरे रा. मांगरुळ या तिघानाही ताब्यात घेऊन त्याचे जवळ असलेली होंडा ड्युओ कंपनीची स्कुटी (मो.सा) क्र.एम.एच 34 ए.डी 2608 व एक बजाज पल्सर कंपनीची 125 सी.सी काळ्या रंगाची मो.सा क्र.एम.एच 29 बी.यु 9857 ताब्यात घेवुन व आरोपीकडील २ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले,सदरची ही कारवाई ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अविनाश चिकराम,बिट जमादार,रमेश मेश्राम,विजय बसेशंकर,किरण दासरवर,अविनाश चव्हाण,यांनी पार पाडली.
