
सहसंपादक : रामभाऊ भोयर
क्रीडा व युवक सेवा संचानलानय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व तालुका क्रीडा संकुल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ऑगस्ट २०२५ ला इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव येथे तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा २०२५ -२६ आयोजन झाले या क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व नामांकित शाळेने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा १४ वर्ष वयोगटामध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेचे अंतिम सामन्यामध्ये मुलांमध्ये नेताजी विद्यालय राळेगाव विरुद्ध मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव हा अंतिम सामना झाला या सामन्यामध्ये मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव या संघाने नेताजी हायस्कूल संघ विरुद्ध ४ गुणांची चढत घेऊन विजय प्राप्त केला त्याचप्रमाणे १४ वर्षातील मुलींच्या अंतिम सामन्या मध्ये मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव विरुद्ध स्कूल ऑफ ब्रिलियंट हा अंतिम सामना झाला या सामन्यामध्ये स्कूल ऑफ ब्रिलियंट या संघाला मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव या संघाने पराभूत करून अंतिम सामन्याचा विजय मिळून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर प्रथम स्थान पटकावले. मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव च्या दोन्ही संघांचे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेकरिता तालुक्यामधून प्रथम क्रमांकावर येऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले या संघाच्या यशाचे श्रेय ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव संचालक डॉ संतोष कोकुलवार सर , शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ शितल बल्लेवार मॅडम शाळेचे व्यवस्थापक श्री साईनाथ बल्लेवार सर क्रीडा शिक्षक विकास शेळके सर ,यश ठाकरे सर शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व पालक वर्ग व शाळेतील सर्व कर्मचारी यांना जाते
