दहावीत द्वितीय येणाऱ्या तंजीरा खान हिचे मराठी मुस्लिम आरक्षण समितीतर्फे अभिनंदन

zफ55स

प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा

10 वीत वर्गामध्ये 93.40 %मिळवीत सेंट अँनिस हायस्कूल वरोरा मधून द्वितीय आल्याने तंजीरा अखिल खान या विद्यार्थ्यांनी चे मराठी मुस्लिम आरक्षण समिती वरोरा तर्फे अभिनंदन करीत पाठिंबा दर्शविला.भविष्यात अशीच प्रगती करीत वरोरा शहराचे नाव रोशन करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली.या यशाचे श्रेय तंजीरा हिने तिच्या वडिलांना व शिक्षकांना देत कोरोना मुळे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागल्याने बरेच नुकसान झाले अशी खंत व्यक्त केली. यावेळी अखील खान, छोटुभाऊ शेख, जाकीर शेख,मोहसीन सय्यद, अफसर शेख,सय्यद ,सलीम पठाण ,मुज्जमिल शेख,व वकील खान हे उपस्थित होते.