1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रिधोरा ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यांतर्गत अत्यंत अभिमानास्पद ध्वजारोहण झाले ते ध्वजारोहण नियमाप्रमाणे सरपंच यांच्या हस्ते सगळीकडे केले जाते परंतु ग्रामपंचायत रिधोरा येथे मा.सरपंच श्री उमेशभाऊ दामोधरराव गौळकार यांनी वेगळा उपक्रम राबवित भारतीय सैनिक श्री प्रशांतभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेऊन त्याच्या हस्ते ते संपन्न करण्यात आले .मा. सरपंच यांनी अभिमानास्पद कार्य केले
या ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत प.स.राळेगाव येथील माजी सभापती प्रवीणभाऊ कोकाटे,तलाठी वाढोणकर साहेब ,कृषी सहायक वाघमारे साहेब , सचिव राऊत मॅडम ,सरपंच उमेशभाऊ गौळकार , उपसरपंच टिनाताई ठेंगणे ,पोलीस पाटील ढगेश्वरराव मांदाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामपंच्यात कर्मचारी उपस्तीती होते.
