धनाड्यानाचं मिळाला पीकविम्याचा लाभ, गरीब शेतकऱी वंचीत ( सरसकट लाभ दया, दलालांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) ची मागणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

      

पीकविम्याची रक्कम काही ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आणि अनेक नुकसानग्रस्त शेतकरी या पासून वंचीत राहिले. राळेगाव तालुक्यातील धनाड्य, बडे आसामी यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले. यात 72 तासाच्या आत तक्रार हा तुघलकी निकष व दलालराज मुळे शेतकरी वंचीत राहिल्याची भावना आहे.या महत्वाच्या प्रश्न|ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) ने वाचा फोडली असून तहसिलदार राळेगाव यांना या अन्यायाबाबत त्वरित कारवाई करण्याबाबत
तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्या नेतृत्वात तहसीलदार राळेगाव यांना सरसकट पीकविमा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पीकविम्या मध्ये काही दलाल सक्रिय झाले. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा व शेतीकामामुळे व्यस्ततेचा गैरफायदा घेऊन श्रीमंत शेतकऱ्यांना तक्रारी करण्याची माहिती देण्यात आली. त्या करीता पैसे आकारून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. तर काही शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तक्रार करूनही त्यांच्या खात्यावर मात्र रक्कम जमा झालेली नाही. विशेष म्हणजे या पीकविम्यामध्ये एकाच गावातील, एकाच शिवारातील सारखे पीक असणारे चार -दोन जण पात्र ठरले तर त्याच शिवारातील सेकडो शेतकरी वंचीत राहिले. या मुळे सर्वत्र संतापाची भावना आहे. या विरुद्ध कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी दिला.
निवेदन देताना सागर वनस्कर विजय भोयर राजू कानडे रोप शेख पराग मानकर अमित अष्टेकर किशोर नकले तेजस इंजळकर कैलास धतकर अमोल भोयर उमेश मेश्राम हनुमान खडसे रमेश पिंपरे किशोर पोहनकर प्रतीक चीचाटे गौरव शिंदे अनिकेत नंदुरकर अरुण राऊत सुरज जुनघरे मनोज धोटे लोकेश राऊत यांचे सह बहुसंख्य शेतकऱी उपस्थित होते
.


तालुक्यातील शेतकरी सातत्याने नापिकीचा सामना करीत आहे. पीकविमा हा त्याला आधार वाटतो. मात्र शेतकऱ्याच्या अज्ञानाचा दलालांनी फायदा उचलला.श्रीमंत लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, गरीब शेतकरी वंचीत राहिले. या बाबत 72 तासाच्या आत तक्रार करूनही ज्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा झाली नाही त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. सोबतच अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले ज्यांनी पीकविमा रक्कम भरली त्यांनी देखील संपर्क करावा, सरसकट शेतकऱ्यांना पीकविमा मिळायला हवा अशी आमची मागणी आहे. त्या साठी तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल.


-बाळू धुमाळ
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राळेगाव