
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे ट्रॅक्टर ट्रॉली चोरीची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयूर मनोहर बुट्टे (वय 32) हे शेतकरी असून त्यांच्या मालकीची शिवम कंपनीची लोखंडी ट्रॉली (क्रमांक MH 29 V 6413) ही त्यांच्या गोट्याजवळ उभी करण्यात आली होती. दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता ड्रायव्हरने ट्रॅक्टरची ट्रिप पूर्ण करून ट्रॉली नेहमीप्रमाणे उभी करून चावी घरी दिली.मात्र 02 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता पाहणी केली असता ट्रॉली जागेवरून गायब झाल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी व परिसरात शोध घेतला, मात्र ट्रॉलीचा कोणताही मागमूस लागला नाही.चोरीस गेलेल्या ट्रॉलीची अंदाजे किंमत ₹40,000 असून अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
