
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
मान्सूनचे आगमन राज्यात झाले मान्सून दोन-तीन दिवसात राज्यात पोचणार आहे या आशाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली पण आता धूळपेरणी उलटण्याची वेळ आली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न आता शेतकरी विचारात आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मृग नक्षत्राच्या तोंडावरती वेगवेगळ्या एजन्सी व हवामान खात्याने पावसाचा अंदाज देण्यास सुरुवात केली त्यातच काही वृत्तपत्रांनी तसेच काही एजन्सीने मानसून तळ कोकणात आला आहेत व मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून 13 तारखेनंतर तो संपूर्ण राज्यात पसरेल अशा पद्धतीच्या बातम्या काही वृत्तपत्र प्रकाशित केल्या तसेच काही एजन्सीने व हवामान खात्याने मान्सून आता लगेच संपूर्ण राज्यभर पोचेल व त्याचा पाऊस येईल असे सांगितले त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात धूळपेरणी केली धूळपेरणी केल्यानंतर शेतकरी पावसाची वाट पाहू लागले मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने व आता मॉन्सूनने पाठ फिरवल्याने ती धूळपेरणी उलटण्याची वेळ आली आहे .दरवर्षीच तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धूळपेरणी करतात कारण पाऊस आल्यावर बैल जोडी तसेच मजुराची चणचण भासते त्यामुळे शेतकरी धूळपेरणी करतात तसेच ज्या शेतकऱ्याकडे अनेक एकर शेती आहे ते शेतकरी सुद्धा धूळपेरणी करीत असतात त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली धूळपेरणी करत असताना शेतकरी आकाशवाणी दूरदर्शन तसेच वृत्तपत्रातल्या बातम्या वरती लक्ष ठेवून राहतात कारण या बातम्या मधून मान्सून विषयी अंदाज सांगितले जाते तसेच या वर्षी सुद्धा शेतकरी त्या सगळ्या बातम्यांवर ती लक्ष ठेवून होते व काहींनी 13 तारखेनंतर राज्यात मान्सून पोहोचेल या गोष्टीवर विश्वास ठेवून धूळपेरण्याबकेल्या पण ते अंदाज आता खोटे ठरताना दिसत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संबंधिताचे सर्व अंदाज चुकीचे ठरले यामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास या नुकसानीस संबंधित हवामान खाते वृत्तपत्र हे आणखी कोण जबाबदार आहे याची जबाबदारी कोणावर तरी फिक्स व्हायला पाहिजे यामागे कोणाचे षडयंत्र आहे का याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता शंका येत आहे कारण धूळपेरणी उलटल्यास शेतकऱ्यांना डबल पेरणी करावी लागेल व त्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे लागेल त्यामुळे हवामान खात्याचा चुकीचा अंदाज दर्शवण्यामागे कोणाचा हात तर नाही ना अशी शंका आता शेतकऱ्यांना येत आहे एकंदरीत मान्सून विषयी सर्वांच्या अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून काही शेतकऱ्यांची धूळपेरणी पूर्ण उलटली आहे तर काही उलटण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले किंवा होणार एवढे मात्र निश्चित त्यामुळे मान्सून विषयी अंदाज दर्शवताना जबाबदारीचे भान संबंधितांना असावे तसेच तंतोतंत अंदाज देण्याचा प्रयत्न संबंधितांनी केल्यास मान्सूनचे अंदाज शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार नाही.
