
प्रवीण जोशी प्रतिनिधी ( ढाणकी)
भारत ही संतांची भूमी आहे. आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई ,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,संत रामदास महाराज यांनी समाजाला आपले संपूर्ण जीवन केवळ लोकांना जनजागृती मध्ये घालवले. तसेच थोर संत श्री बाळगीर महाराज होऊन गेले. त्याच अनुषंगाने ढाणकी येथे दत्त मंदिरात त्यांची पुण्यतिथी अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. ढाणकी येथे त्यांची बरीच शिष्य मंडळी आहे. त्याचबरोबर त्यांची नांदेड, वेणी , महाराष्ट्र, वआंध्रामध्ये पण भरपूर शिष्य मंडळी आहे. संत श्री बाळगीर महाराजांनी आजचा तरुण व्यसनाधीन होत चालला आहे. त्यांना दत्त नामाचे धडे देऊन व्यसनापासून दूर करणे हे काम बापूंनी हाती घेतली होते. त्यांनी दत्त नामाचा मूलमंत्र देऊन भक्त मंडळीना प्रेरित केले. आलिया जन्माचे करावे स्वहित मना आनंद दत वेळोवेळा!ही शिकवण दिली.काल त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शिष्य मंडळींनी महापूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यांची सहावी पुण्यतिथी अशाप्रकारे साजरी करण्यात आली.त्यावेळी त्यांचे बरीच शिष्य मंडळी हजर होती.
