
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील हरिओम नगर येथील विनोद किसनाजी काळमेघ यांचे अपघाती निधन झाले. राळेगाव शहरात अत्यंत सुस्वभावी युवक म्हणून त्यांची ओळख होती. बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांना राळेगाव तालुक्यातील शशिकांत उर्फ बाळू धुमाळ मित्र परिवार, मंगेश राऊत मित्रपरिवार व हरिओम नगर येथील रहिवासी यांनी मदतीचा हात दिला.
स्व. विनोद च्या पत्नी शालूबाई काळमेघ यांना त्यांचे घरी जाऊन आर्थिक मदत देण्यात आली.स्व. विनोद यांचे मागे पत्नी मागे दोन व मोठा आप्तपरिवार आहे. या अपघाती निधनाचे वृत्त माहित होताच राळेगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ वेक्त करण्यात येतं होती.
मदत देतांना सा. आत्मबल संपादक मंगेश राऊत, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, जगदीश सरदार, प्रकाश नाकाडे, अशोक कोल्हे, विनोद धामंदे, मारुती राऊत, दिलिप कन्नाके, बबलु कांबळे, हरिष आत्राम, आकाश कुळसंगे, अशोक घारवटकर उपस्थित होते.
