राळेगाव तालुक्यातील खैरी येथे कर्तव्य दक्ष खुशालभाऊ वानखेडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पालक सभा


      राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


खैरी: आपला पाल्य शाळेत जातो की नाही त्याला लिहिता वाचता येत की नाही याची माहिती व्हावी व शिक्षक व पालक यांची शिक्षणाविषयी विचाराची देवाण-घेवाण व्हावी व शिक्षणाचे बाबतीत काही पालकांना अतिरिक्त ज्ञान व माहिती असल्यास त्याची शिक्षक व पालकात चर्चा व्हावी जेणेकरून शिक्षक व पालकात समन्वय घडावा या उदात्त हेतूने खैरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल भाऊ वानखेडे यांनी बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी शिक्षक पालक सभा शाळेचे मुख्याध्यापक कर्तव्य दक्ष संजय राव खडसे सर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरी येथे आयोजन केले होते.
        या पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अनेक पालकांनी या पालक सभेला हजर होते. या पालक सभेत शाळेचे मुख्याध्यापक श्री खडसे यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीबद्दल पालकांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी या पालक सभेत विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व महादीप परीक्षा त्यामध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यासाठी दररोज एक तास शिक्षकांनी त्या विषयावर तासिका घ्यावी असे पालक सभेत ठरले व त्यास शिक्षकांनीही अनुमती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शिक्षकांनी तसेच पालकांनी सुद्धा प्रोत्साहित करून जेवढे जास्त विद्यार्थी सामान्य ज्ञान सारख्या परीक्षेत सहभागी होतील यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच शाळेतील शालेय पोषण आहार, गणवेश याबाबतीत शाळेचे मुख्याध्यापकांनी माहिती दिली व पोषण आहार व्यवस्थित मिळतो की नाही यासाठी पालकांनी सुद्धा शाळेत येऊन पोषण आहार कसा