

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
..
नाशकात सुरू झालेल्या अनोख्या अशा ऑपरेशन हॉस्पिटल टीम ने आज एका पेशंटच्या नातेवाईकांचे वोकहार्ट हॉस्पिटल ने जास्तीचे पैश्यांचा परतावा मागच्या 4 दिवसापांसून थकवलेला असताना त्या नातेवाईकाने अनेक वेळा फोन करूनही हॉस्पिटल प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही आणि म्हणून पेशंट ने टीम ऑपरेशन हॉस्पिटल ला संपर्क केला असता टीम तिथे पोहोचली व पैसे न देण्याचे कारण विचारले तर हॉस्पिटल प्रशासन उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने जितेंद्र भावे यांनी कपडे काढून तिथेच ठिय्या देण्याचा निर्णय घेतला, काही वेळात पोलीस आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली परंतु अजून हॉस्पिटल वर कारवाई होणार की नाही याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून आलेले नाही थोडाच वेळात कारवाई होईल असे सांगण्यात येत आहे तसेच पोलीस जितेंद्र भावेंनाही घेऊन गेल्यामुळे इतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे आणि न्याय मागण्याऱ्यावर पहिली कारवाई का ? हा सवाल कार्यलरत्यांकडून विचारला जात आहे
