
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील जागजई येथे बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण विदर्भातून गोंडी देव आगोळी करीता येत असते तथा जवळपास 50000 हजर भाविक उपस्थीत असतात, जेणे करून जागजई गावात जत्रेचे स्वरूप निर्माण होत असतात त्याच अनुसंघाने आदिवासी समाजाचे सेवक संदीप पेंदोर यांनी वेळ अगोदरच प्रशासनाने जागजई येथे पंचधारा येथे रस्ता सोईस्कर करावा, स्त्रियांना कपडे बदलविण्याकरीता व शौच्यालयास स्तेंथ बनविण्यात यावे,भाविक भक्त मंडळी करीता आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात यावी,खोल पण्यात जावू नये या करीता लाल झेंडे लावण्यात यावे व आंगोळीची जागा ही व्यवस्थित करण्यात यावी अश्या काही मुलभुत सोई उपलब्ध प्रशासनाने करून द्याव्या जेणे करून आमची माता भगीनी उघडयवर आगोळ करणार नाही, याच देवाच्या जत्रेत मागील काही वर्षे आंघोळ करताना डोहात जिव गेला होतो, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होवू नये म्हणून शासन हलगर्जी पणा करणार नाही वा कोणालाही त्रास होणार म्हणून प्रशासनाने गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देवून विषय मार्गी काडावा असे पब्लिक पोस्टशी बोलताना संदिप ग.पेंदोर.आदिवासी समाज सेवक राळेगाव जिल्हा यवतमाळ यांनी सांगितले.
