
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘एमएस – सीआयटी’ या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता अभिमानाला राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेचा. “स्कॉच पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे .
डिजिटल साक्षरता या श्रेणीत एमकेसीएलला हा बहुमान मिळाला आहे. एमकेसीएलने गेल्या पंचवीस वर्षात डिजीटल शिक्षण, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरणात दिलेल्या सातत्यपूर्व योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. “स्कॉच पुरस्कार” हा भारतातील सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास आणि कौशल्यवृद्धीसाठी दिला जाणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचे काम ‘एमएस – सीआयटीने’ प्रभावीपणे केले आहे.
हा कोट्यवधी विद्यार्थ्यांचा सन्मान : श्री समीर पांडे या यशाबद्दल एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री समीर पांडे यांनी सांगितले की, हा पुरस्कार एमकेसीएल परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान कोट्यवधी विद्यार्थी, त्यांचे पालक हजारो केंद्रप्रमुख , प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स , एमएसबीटीई आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विश्वासार्ह पाठबळामुळेच शक्य झाला आहे या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नामुळेच महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभी राहिली आहे. पाचहजार हून अधिक केंद्राचे जाळे आणि नव्या युगाचा अभ्यासक्रम एमकेसीएलच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या पाच हजार हून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचले आहे. विशेष म्हणजे आजच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित युगाची गरज ओळखून एमएस – सीआयटीचा अभ्यासक्रम आला असून अधिक अद्यायावत करण्यात आला आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंट्रेलीजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), सायबर सिक्युरिटी, (सायबर सुरक्षा), डेटा लिटरसी ( माहिती साक्षरता) , क्लाऊड कम्प्युटिंग आणि आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय सन्मानामुळे महाराष्ट्राला अधिक सक्षम डिजिटलदृष्ट्या साक्षर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सज्ज बनवण्याच्या एमएस-सीआयटीच्या मोहिमेला आणखी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
