
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील मोठ्या सोसायटी पैकी एक असलेल्या कीन्ही जवादे सोसायटी वर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुधीर जवादे पॅनल बहुमताने विजयी झाले आहे.कीन्ही जवादे,देवधरी,चाचोरा,धुमका,गाडेघाट,या पांच गावाच्या सोसायटीचवर सुधीर जवादे गटाची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आदित्य सुधीर जवादे, सुषमा सुधीर जवादे, अमोल भोयर, मोरेश्वर ठाकरे,त्रीवेणाबाई वाढई, जनार्दन ढेकणे, राजेश्वर येडमे, गजानन गुरनुले, दामोधर खापणे, चंद्रकांत लेनगुरे प्रचंड बहुमताने निवडून आले आहे. या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे भाजपच्या माजी जी.प. सदस्यां प्रीती काकडे यांचे नातेवाईक प्रफुल्ल काकडे यांचा गजानन गुरनुले या एका सामान्य शेतकरी पुत्राने पराभव केला असून मतदारांनी भाजप तालुका महिला अध्यक्षा,व काकडे पॅनलचा धुव्वा उडविला आहे.
राजकीय रणनितीकार सुधीर जवादे , यांना बबनराव मांडवकर, दशरथ मोहुर्ले, नामदेवराव मोहुर्ले, विजय वाढई यांची विशेष साथ मिळाली.या विजयासाठी नरेश ठाकरे,प्रणय वाढई मनोज लोणबले अमोल हरबडे बंडु भारसाकरे, घनश्याम मांडवकर महेश मांडवकर गंगाराम जी आत्राम सरपंच,बालु मांडवकर, दिपक मांदाडे,गजु धूर्वे, प्रभाकर, मधुकर ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, हर्षल मेश्राम विनोदभाउ कावडे, देवा मेश्राम वामनराव लेनगुरे कीशोर खैरकार जानकीदास वाढ ई, धनराज तोडसाम देवेंद्र उईके,ईंदरसींग घेई, सुनील मेश्राम, यांनी विशेष प्रयत्न केले.
