२८ सप्टेंबरला चंद्रपुरात कुणबी समाजाचा मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने येत्या २८ सप्टेंबर २०२४ ला चंद्रपुरातील हॉटेल राजवाडा ताडोबा रोड तुकूम येथे सकाळी ११ वाजता कुणबी समाजाचा भव्य मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी चंद्रपुरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर,भंडार्‍याचे माजी खासदार मधुकरजी कुकडे, चंद्रपूरचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राजुर्‍याचे माजी नगराध्यक्ष अरूण धोटे,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार तथा दलित मित्र आदिवासी सेवक आणि राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष डी.के आरीकर उपस्थित राहणार आहे.यावेळी कार्यकमाला राष्ट्रीय कुणबी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.बळवंत तिवाडे, सरचिटणीस दादाराव डोंगरे, उपाध्यक्ष डॉ.बळवंत भोयर, प्रदेश अध्यक्ष सुरेश गुडदे पाटील, प्रा.शेषराव येलेकर व गडचिरोली, के.झेड.शेंडे भंडारा, दिलीप खोरगडे नागपूर,बाबाराव भोयर वर्धा, प्रदीप वादाफळे यवतमाळ आणि विदर्भातील इतरही जिल्ह्यातून कुणबी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमास खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी खा.मधुकरजी कुकडे आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहेत तसेच याच कार्यक्रमात जात निहाय जनगणना, शेतकरी व तरुणाच्या प्रश्नावर विचार मंथन करण्यात येणार आहेत तरी कुणबी समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक व संयोजक रमेश बोरकुटे राष्ट्रीय सचिव, अतुल ठाकरे जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष दिपा कष्टी आणि कार्याध्यक्ष उर्मिला बोबडे यांनी केले आहे.