गुजरी नागठाणा येथे तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

सहसंपादक : रामभाऊ भोयर

श्री गुरुदेव सेवा मंडळ र न ९७३ व समस्त गुजरी नागठाणा यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56 वा वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा 68 वा पुण्यस्मरण सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2024 शुक्रवार ते दिनांक 22 डिसेंबर 2024 रविवारला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराचे प्रांगणात विविध मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक रचनात्मक उपक्रमाचे तसेच दैनिक ग्राम सफाई ग्रामगीता वाचन भजन प्रवचन सामुदायिक प्रार्थना कीर्तन. मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे दिनांक 20 डिसेंबरला सकाळी नऊ वाजता झेंडावंदन व महोत्सवाचे उद्घाटन श्री जानराव भाऊ गिरी उप नगराध्यक्ष राळेगाव यांचे शुभ हस्ते श्री संजय जी धिया तुलसी इंडस्ट्रीज राळेगाव यांचे अध्यक्षतेखाली श्री विलासराव भोयर प्रमुख अतिथी श्री प्रदीप भाऊ ठूणे श्री राजूभाऊ नागपुरे हमीद भाई पठाण मधुकरराव गेडाम श्री वाल्मीक राव मेश्राम श्री भगवान धनरे श्री कृष्णाजी राऊळकर श्री शंकरराव तोडासे श्री सुधीर चौधरी श्री रामभाऊजी कोवे श्री उमेश भोयर श्री गोविंदराव झोड श्री पी डी मेंडुलकर श्री नंदू भाऊ टिपणवार प्रमुख पाहुणे यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनपर ,सायंकाळी आठ ते दहा वाजता गणेश शिंदे व संच नेरी जिल्हा वर्धा यांचा श्री संत एकनाथ महाराजांचे रंगीत संगीतमय भारुड दिनांक 21 डिसेंबर शनिवारला सायंकाळी आठ ते दहा वाजता ह भ प रामपाल महाराज धारकर सप्त खंजिरी वादक यांचे मनोरंजनात्मक विनोदी ग्रामगीतेवर राष्ट्रीय कीर्तन दिनांक 22 डिसेंबर रविवारला सकाळी सात वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे प्रतिमेची भजन दिंडीसह शोभायात्रा ,दुपारी बारा वाजता ह भ प ज्ञानेश्वर महाराज डफर भारी जिल्हा यवतमाळ व संच यांचे काल्यावर कीर्तन दुपारी एक वाजता श्री चित्तरंजन दादा कोल्हे झाडगाव यांच्या अध्यक्षतेखाली श्री प्रशांत तायडे पिंपळखुटी श्री विनोद भाऊ काकडे रावेरी श्री डॉक्टर कुणाल भोयर राळेगाव श्री राजूभाऊ तेलंगे रावेरी श्री डॉक्टर ज्ञानेश्वर मुडे निधा श्री गणेश फटिंग धानोरा श्री अरुण भाऊ खंगार खैरी श्री शेयरअलीबापू लालानी श्री किशोर भाऊ कांढरवार वाढोणा श्री रुपेश रेंगे झाडगाव व इतर तालुक्यातील गु से म कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर, समारोप दुपारी तीन वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता गु से मंडळ गुजरी यांचे खंजिरी भजन नऊ वाजता महिला गु से मंडळाचे खंजिरी भजन व राष्ट्रवंदणेने महोत्सवाची सांगता .कृपया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये राळेगाव तालुक्यातील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे श्री गंगाधर घोटेकर जीवन प्रचारक गु से म व आयोजक युवक समिती व समस्त गुजरी नागठाणा समस्त ग्रामवासीय जाहीर आव्हान करीत आहे.