
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे रात्री गस्त दरम्यान 01.30 वाजता सुमारास गावातील जागरूक नागरिक यांनी फोन वरून माहिती पोलीस स्टेशनला माहिती दिली की, जवादेले आऊट मध्ये एका बंद घराचे आवारात एक इसम चोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती मिळताच रात्र गस्त अंमलदार पो हवा भोयर, अडपावार, पो का अरविंद चव्हाण असे घटनास्थळी पोहचले त्यांना पाहून सदर इसम पळून जात असताना ताब्यात घेतला त्याचा एक साथीदार मित्र मोटार सायकल सह रोडचे बाजूला अंधारात उभा होता त्यास सुद्धा ताब्यात घेतले त्यांचे नाव 1. बळीराम शेषराव कुरडे वय 38 वर्ष, 2. लकी उर्फ विश्वास उर्फ युवा रामभाऊ भोगे वय 24 वर्ष दोघे रा वडद ता महागाव जि यवतमाळ असे आहे. दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना चेक केले असता त्यांचे जवळून पेंचीस व लाठी जप्त करण्यात आली. मोटार सायकल चा नंबर दिसणार नाही अश्या प्रकारे माती लावलेली होती. आरोपी हे वडकी येथे घरफोडी करून चोरी किंवा जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचे जवळ एक मो सा की 40000 व दोन मोबाईल की 6000 एकूण 46000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर चोरीची तयारी आणि त्याबाबत प्रयत्नात असण्याबाबतचा गुन्हा नोंद करून आरोपी यांना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार विजय महाले यांचे मार्गदर्शनात नापोका रमेश मेश्राम व किरण दासारवार करीत आहे.
