न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव मधील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये दिनांक ५ सप्टेंबर ला शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमा चे औचित्य साधून शाळे मध्ये आज स्वयंशासन विद्यार्थ्यां कडून राबविण्यात आले. आज शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडून आज स्वयंम शासन उत्साहात राबविण्यात आले . या स्वयंम शासनाच्या मुख्याध्यापिकां म्हणून कु हर्षिता सांभरे तर उपमुख्याध्यापक कु तनु कोहळे यांनी आपली भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक जितेंद्र जवादे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप मुख्याध्यापक विजय कचरे ,जेष्ठ शिक्षिका सौ इखे, राजेश काळे, सूचित बेहरे, संजय चिरडे हे मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक गोपाल बुरले, यांनी केले. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाचे वेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिना निमित्ताने आपले विचार व्यक्त केले तसेच उपस्थित सर्व पाहुणे व अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातुन शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपले विचार वेक्त केले. या शिक्षक दिन कार्यक्रमाचे निमित्ताने शिक्षकांची भूमिका पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे सुद्धा देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अनुष्का गोरे,लक्ष्मी मेश्राम,यांनी तर आभार प्रदर्शन प्रीती निखाडे, कु. यामिनी नंदरे हिने केले. शिक्षक दिन कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थ्यां मध्ये मोठा उत्साह दिसून आला तर या कार्यक्रमा करीता उपस्थितीत सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.