
लाखो रुपयांचे साहित्य चोरीला जाऊन ही तक्रार नाही अभियंता व कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर पाण्याने तुडूंब भरुन असलेल्या मजरा धरणं प्रकल्प च्या सबंधित अभियंता व कर्मचारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षितधोरणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात पाणी येत आहे. धरणातून सिंचना साठी असलेला मोठा पाईप गेल्या आठ महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे,महत्वाचे साहित्य चोरीला जाऊन ही तक्रार नाही असा मोठा भोंगळ कारभार शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रार निवेदनातून चव्हाट्यावर आला आहे हे विशेष.
मजरा धरणा मधुन कॅनॉल च्या माध्यमातुन पिपंरी, व जळका शिवारातील शेतीला पाणी दिले जाते परंतु धरणातून कॅनॉल ला पाणी सोडले जाते तो पाईप च आठ महिन्या आधी चोरट्या नी कापून नेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो प्रयत्न त्यांचा असफल झाला व त्यांनी पाईप कापून ठेवला पाईप कापून आज आठ महिने झाले परंतु मजरा धरण संबंधित अभियंता व कर्मचारी यांनी अजुन पर्यंत लक्ष दिले नाही व त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे ज्या वेळेस शेतकऱ्यांनी आमदाराना या संदर्भात निवेदन दिले .
परंतु पहिलेच शेतकरी या वर्षी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे व पिक यावर्षी अर्ध्यावर आली आहेत कपाशी व तुरीला आता ओलीत करून काही प्रमाणात उत्पन्न वाढवू शकत होते परंतु पाणी कॅनॉल ला सोडत नसल्याने काही लोकांची रब्बी ची पेरणी खोळबली आहे
आठ महिने पासुन पाईप चोरीला जाते पण अधिकारी तो मेन पाईप असून सुद्धा एवढे दिवस जाऊन पण दुरुस्त केला नाही आहे ही खुप मोठी शोकांतिका चं नाही का?
पाईप चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला की नाही ही पण शंका आहे शेतकऱ्यांना कॅनॉल च्या माध्यमातुन पाणी सोडले जात असते तर दरवर्षी रब्बी साठी तर मग अधिकारी वर्गानी निरीक्षण केले नाही काय या दिवसात तसेंच एका कॅनॉल च्या वरून शेतांत जाण्यासाठी लोखंडी पुल होता शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी तो पण दोन महिने आधी पुर्ण चोरीला गेला आहे.असाच भोंगळ कारभार मजरा धरणं प्रकल्पाचा निदर्शनास येत आहे.
