
सहसंपादक: रामभाऊ भोयर
चार चाकी व दुचाकीचा भीषण अपघात घडून या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी ५:०० वाजताच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील वडकी उडान पुलावर घडली सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारचे जीवितहानी झाली नसून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद कडून एम एच ४९ बीबी ८३९४ या क्रमांकाचे चारचाकी वाहन नागपूरच्या दिशेने जात होते दरम्यान वडकी येथील उड्डाण पुलावर चार चाकी वाहनाने एमएच ३१ इ एल ६५८९ या क्रमांकाच्या दुचाकीला मागवून जोराची धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहनाने महामार्गावर दोन ते तीन पलट्या घेतल्या या यातील वाहन व त्यातील सहकारी वाहनाच्या बाहेर फेकले गेले तर दुचाकी चालक रोडच्या बाजूला फेकले गेले घटनास्थळी तातडीने महामार्गाची चमू व पोलीस दाखल झाले व यातील गंभीर जखमी ंना पुढील उपचारासाठी वडणेर येते रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे अपघात नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती व वाहतूक पूर्णता खोळंबली होती अखेर नागरिकांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला केले व वाहतूक सुरळीत केली अपघातातील गंभीर जखमीतील एकाचे नाव विजय चांगलानी हिंगणघाट तर तिघांचे नाव कळू शकले नाही या अपघातात गंभीर जखमी झालेल्याना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
