
माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके व माजी जिल्हाध्यक्ष प्रफुलभाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बळकटी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील वसंत सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या संचालक मंडळात युवक काँग्रेस राळेगाव शहर अध्यक्ष सनी सपन छोरिया यांची संचालकपदी निवड झाल्याने तालुक्याच्या सहकार व राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. ही निवड माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रफुलभाऊ मानकर व नंदू शेठ गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.दि. २३ जून २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रिक्त झालेल्या संचालक पदाबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेच्या उपविधीनुसार रिक्त जागा भरण्याचा अधिकार संचालक मंडळाकडे असल्याने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नव्या संचालकाची निवड करण्यात आली.या निवडीमुळे युवक नेतृत्वाला सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले असून, सनी सपन छोरिया यांच्या माध्यमातून संस्थेच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, वसंत सहकारी जिनिंगच्या संचालक मंडळातील या बदलामुळे राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात संस्थेच्या विकासासाठी संचालक मंडळ प्रभावी निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
