
सहसंपादक : रामभाऊ भोयर
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूरी दिली जात आहे. राज्यभरात एकाच वेळी 20 लाख लोकांना घरकुल मंजुरी देऊन 10 लाख लोकांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. हा कार्यक्रम पुण्यात पार पडला, तसेच राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्येही मंजुरी पत्र व हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
पंचायत समिती राळेगाव येथे हा कार्यक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. चित्तरंजन दादा कोल्हे, भोयर मॅडम, प्रीती ताई काकडे आणि माजी उपसभापती सलामे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अध्यक्षीय स्थान ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य श्री. चित्तरंजन दादा कोल्हे यांनी भूषवले. पंचायत समिती राळेगाव मार्फत 5 हजार लाभार्थ्यांना मंजुरी देऊन प्रथम हप्ता वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार सांख्यिकी बनकर मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक सहायक गटविकास अधिकारी श्रीमती इसळ मॅडम यांनी केले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करत तात्काळ घरकुल बांधकाम करण्याचे आवाहन केले.
मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य आवास योजनेत 13 हजार पेक्षा जास्त घरकुले मंजूर करून 7 हजार घरकुल पूर्ण करण्यात आल्याबद्दल गटविकास अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
