पाच तारखेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे धरणे सलग चौथ्या धरणे आंदोलनकडे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 5/7/2024 रोज शुक्रवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या आदेशानुसार धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले. धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे असताना सुद्धा सलग चौथ्या धरणे आंदोलनाकडे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी पाठ फिरवली त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आंदोलनामध्ये 15मार्च 2024च्या संचमान्यता व प्राथमिक शाळांचे सक्षिमिकरण व दर्जावाढ संदर्भातील घातक असे शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.हे आंदोलन संघटनेकडून विदर्भात सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे यांनी स्वीकारले.त्यावेळी त्यांनी आपली मागणी शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु हे धरणे आंदोलन संघटनेच्या वरीष्ठाच्या आदेशानुसार संबंधित विभागाला लेखी निवेदन सादर करून करण्यात आले असतांना सुद्धा शिक्षणाधिकारी माध्यमिक उपस्थित नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून यापूर्वी पण संघटनेचे प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन यांच्या नेतृत्वात सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता त्यावेळी सुद्धा शिक्षणाधिकारी माध्यमिक कामानिमित्ताने बाहेर गेल्या अशी माहिती देण्यात आली. पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत तेथील जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली नसल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभारावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या बाबतीत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सरांनी वरीष्ठाशी चर्चा करून कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळण्याबाबत सुचना करण्यात याव्या आणि अशाप्रकारे धरणे आंदोलन असतांना शक्यतो जबाबदार अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारण्याची जबाबदारी पार पाडावीअशी मागणी करण्यात येत असून या धरणे आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन , जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे जिल्हा कार्याध्यक्ष आनंद जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे,सल्लागार मनोज जिरापुरे, उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते, साहेबराव धात्रक, आकुलवार , चव्हाण , भाऊराव राऊत,उमाकांत राठोड, दिवाकर नरूले, पांडुरंग वैद्य, विठ्ठल परांडे, गजानन पतिंगे, नितीन गावंडे,ईरशाद खान,प्रभू गंडेवाड, संजय मनवर, ल.ना.कचरे, दिलीप बेलसरे, वैशाली चौधरी, मंगला वडतकर,संध्या जिरापूरे, पंकज राठोड, अरूण गारघाटे,व्ही.आर. वाघमारे, ज्ञानेश्वर मुरखे,मराठा सेवा संघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, गुलाब सोनोने, मनोज दुधे, विनायक खोब्रागडे, रामदास गोरे, संजय मानतुटे,राजू कुपटे, अनिरुद्ध कांबळे,सोनल मोरे, सतिश काळे, मधूकर चिव्हाणे, सारंगधर गावंडे,माजी मुख्याध्यापक खारकर, विशाल मस्के यांच्या सह वेगवेगळ्या संघटनाचे प्रतिनिधी, पदाधिकारी व समस्याग्रस्त शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
चौकट
निवेदन स्वीकारत असताना उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे यांना विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 29 जून रोजी वेतन जमा झाले असताना यवतमाळ जिल्ह्याचे वेतन माहे जूनचे का झाले नाही असे पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता गोडे यांनी वेतन पथक अधीक्षक यांना भ्रमणध्वनी वरून चौकशी केली असता वेतन प्रणाली मध्ये काही दोष असल्याचे वेतन पथक अधीक्षकांनी माहिती देऊन आपल्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. अमरावती येथे झालेल्या तक्रार निवारण सभेमध्ये देण्यात आलेल्या कुठल्याही सूचनांचे पालन अद्यापही माध्यमिक शिक्षण विभाग व वेतन पथक कार्यालयाने केले नसल्याचा स्पष्ट आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.