
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
नागपूर हिवाळी अधिवेशनात अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पी बि आय च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सहभागी मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी सर्व सदस्य मंडळी सहभागी केली होती या मोर्चाचे नेतृत्व मा मधुकर निस्ताने पि बि आय (विदर्भ समाज ) आणि मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ मा अरुण कपिले विदर्भ संघटक यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा आयोजित होता* गरीब कष्टकरी शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, सरकारी जमीन वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर अतिक्रमण धारक शेतकरी जवळपास चाळीस पन्नास वर्षांपासून अतिक्रमण करून आपल्या कष्टाने कुटुंबातील लोकांना जगवतात परंतु अजूनही त्या जमिनीवर मालकी हक्क मिळाला नाही म्हणून अशा समस्या ऐकून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे जाऊन चर्चा करण्यासाठी महामोर्चात सहभागी झालो होतो अतिक्रमण धारक मोर्चा ची दखल घेत सरकार च्या वतीने शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यावेळी मा मधुकर निस्ताने पि बि आय विदर्भ समाज मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच होते सोबत अरुण कपिले विदर्भ संघटक रमेश सोलंकी आणि शेख समिना शेख सहभागी झाले होते सविस्तर चर्चा केली आणि जिल्हा अधिकारी कार्यालय येथे एक मिटींग घेऊन या विषयावर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आश्वासन दिले अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महामोर्चात विशेष विदर्भ वादी नेते मा अरुण भाऊ केदार, सुनील चोकारे मुकेश मासुरकर मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच आणि कृष्णा भोंगाडे सहभागी होते यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अन्यायग्रस्त अतिक्रमण धारक शेतकरी जवळपास चारशे ते पाचशे लोक सहभागी होते या मोर्चात काही समविचारी संघटना च्या नेते मंडळी चे आभार मधुकर निस्ताने मोहण जाधव आणि पि बि आय विदर्भ समाज पदाधिकारी यांनी मानले
