
समूहातील मैत्रभाव, एकोप्याचे अनोखे उदाहरण
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव : शहरातील वर्धा रोडलगत असलेल्या माऊली पार्क परिसरात दररोज सकाळी एकत्र फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, युवक, शिक्षक, डॉक्टर, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी मिळून तयार केलेला ‘माऊली पार्क मॉर्निंग ग्रुप’ हा सदैव एकोप्याचा आणि मैत्रीभावाचा आदर्श मानला जातो.दररोजच्या मॉर्निंग वॉकदरम्यान “गुड मॉर्निंग, नमस्कार, जय श्रीराम” अशा प्रेमळ अभिवादनातून या ग्रुपची सकाळ सुरू होते. शांत, निसर्गमय वातावरणात योगा, व्यायाम आणि चालण्यामुळे मनःशांती व आरोग्य संतुलन हीच या समूहाची खास ओळख आहे.
या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांपासून ते निवृत्त नागरिक, युवक वर्गापर्यंत सर्वांचा समावेश असल्याने आपुलकीचा, एकमेकांशी जोडून ठेवणारा बंध अधिक दृढ झाला आहे. त्याच भावनेतून ग्रुपमधील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस साजरा करण्याची सुंदर परंपरा येथे पाळली जाते.
नक्षीने सरांचा वाढदिवस शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन साजरा
१२ डिसेंबर २०२५ रोजी संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक राकेश नक्षीने सर यांचा वाढदिवस ग्रुपतर्फे अतिशय आनंदी आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
छोटेखानी कार्यक्रमात नक्षीने सरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी कुबडे सर आणि शेरकी सरांनी नक्षीने सरांच्या अभ्यासू, मनमिळाऊ आणि होतकरू स्वभावाविषयी मनोगत व्यक्त केले. ग्रुपमधील सर्व सदस्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवला.
ग्रुपचे मान्यवर सदस्य उत्स्फूर्त उपस्थितया वाढदिवस कार्यक्रमाला दोडीवार सर, वैद्य साहेब, माकोडे सर, यादव, विठ्ठलराव माकोडे, बोडीवार, बोरकुटे, पाटील, खेरडे, तिजारे, वाकडे, कुबडे, ठाकरे, डॉ. कोकरे, शेरकी, सातारकर, उपासे, मडावी, महल्ले, झोपये, तेलंगे, गवळी, राऊत, कुठे, शेडमाके, उगवे सर आदी सदस्य उपस्थित होते.
माऊली पार्क मॉर्निंग ग्रुपची एकमेकांशी जोडणारी ही सकारात्मक परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
