सहाय्यक दुय्यम निरीक्षक शंकर घाटे यांना लाचेची रक्कम स्विकारतांना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाही

लोकहीत महाराष्ट्र / नितेश ताजणे

पांढरकवडा येथील सहायक दुय्यम निरीक्षक शंकर गोविंदराव घाटे यांना मद्य परवानावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी नकारदाराकडुन १२ हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधकविभागाने सापळा रचुन पकडले.
तक्रारदार यांनी दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी अँन्टी करप्शन ब्यूरो कार्यालय यवतमाळ येथे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पांढरकवडा येथील निरीक्षक व लोकसेवक श्री शंकर गोविंदराव घाटे सहायक दुय्यम निरीक्षक हे तक्रारदार यास त्यांचे विदेशी मद्य परवानावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लाच मागणीची लेखी तक्रार दिली होती.
त्यावरून दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक शंकर गोविंदराव घाटे, सहायक दुयम निरीक्षक यांनी स्वतः करीता तक्रारदार यांना त्यांचे विदेशी मद्य परवानावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ६ हजार रुपये तसेच त्यांचे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय पांढरकवडा येथील निरीक्षक यांचेकरीता मासीक हप्ता ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. यानंतर दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक शंकर गोविंदराव घाटे, सहायक निरीक्षक यांनी १२ हजार रुपये लाच रक्कम जि.प. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) शाळेचे गेट जवळ तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही श्री विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती आणि श्री अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक राजेश मुळे, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर नालट, अँटी.क ब्यूरो यवतमाळ आणि अमलदार राहुल गेडाम सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, व चालक संजय कांबळे अँन्टी करप्शन ब्यूरो, यवतमाळ यांनी केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँन्टी करप्शन ब्यूरो यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७२३२ २४४००२ तसेच टोल फ्रि कमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, यवतमाळ यांनी केले आहे.