
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आमदार सुधाकर अडबाले सर
् महाराष्ट्र सरकारने होऊ घातलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिनांक 12 डिसेंबरला यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.या आंदोलनातून पंचेचाळीस मागण्या शासनाकडे सादर करण्यात आल्या त्यामध्ये विशेष करून सरसकट कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन योजना लागू करावी हा प्रश्न महत्त्वाचा असल्याने भरपूर प्रमाणात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनीं या आंदोलनात सहभागी झाले होते.या धरणे आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय सुधाकरराव अडबाले सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सोबतच नागपूर विभागाचे पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस तथा माजी शिक्षक आमदार आदरणीय विश्वनाथजी डायगव्हाणे सर, आमदार विक्रम काळे सर, आमदार जयंत आसगावकर आमदार किरण सरनाईक सोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप भिमरावजी कडू सर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला अमरावती विभागाचे आणि नागपूर विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गर्दी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.त्यावेळी या कार्यक्रमाला विशेष करून प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर सर वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार सर यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर, आनंद मेश्राम,शाम बोढे,श्रावणसिंग वडते, गोपाळ बुरले किशोर बोढे, नितीन जुनूनकर नागपूर कार्यकारिणी पदाधिकारी संजय वारकर अनिल गोतमारे अविनाश बडे तल्हार सर सुनील शेरकी सुरेंद्र अडबाले चंद्रपूर अजय लोंढे मनोज जिरापूरे सुरेंद्र कडू अरूण गारघाटे विलास वाघमारे संजय चिंतावार दिवाकर नरूले विजय गौरकार जोगी सर किशोर बोढे भुपेंद्र देरकर पंकज राठोड धनंजय ठेपाले यांच्या सह अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व आजिवन सदस्य व समस्याग्रस्त शिक्षक बंधू भगिनीं उपस्थित होते.हा कार्यक्रम बारा वाजेपासून चार वाजेपर्यंत होऊन शेवटी संपन्न झाला.
