
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव नगरपंचायतीने अलीकडेच लागू केलेल्या नव्या मालमत्ता कर प्रणालीमध्ये अवास्तव वाढ तसेच गणनेतील अनेक त्रुटी आढळून येत असल्याच्या निषेधार्थ आज राळेगाव येथील व्यापारी संघटनेतर्फे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.नवीन कर आकारणीमुळे व्यापाऱ्यांवर अनावश्यक आर्थिक ताण येत असून अनेकांना मागील वर्षांच्या तुलनेत अनेक पटीने कर वाढीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. कर वाढीची पद्धत, कर गणनेतील चुका आणि नागरिकांना न देता आलेली योग्य माहिती यामुळे व्यापारी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन तातडीने करप्रणाली सुधारावी, चुकीच्या नोटिसा मागे घ्याव्यात आणि निष्पक्ष, पारदर्शक प्रणाली लागू करावी, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली.
निवेदन देताना समस्त व्यापारी संघटना राळेगाव शहर तर्फे मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. त्यामध्ये विशेषतः
गोपालभाऊ मशरू, अनिलभाऊ वर्मा, उमेशभाऊ बोरा, प्रशांत महाजन, गजेंद्र वैद्य, प्रफुल कोल्हे, आशिष वर्मा, गजानन काळे, निलय घीणेमीने, राजीव गुंदेच्या, अशोक वर्मा, दीपक गांधी, लेनिन वैद्य, सचिन चौधरी, शुभम तोटे या सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवत व्यापाऱ्यांच्या समस्या ठामपणे मांडल्या.व्यापारी वर्गाने नगरपंचायतीने घेतलेल्या एकतर्फी निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली असून, योग्य दुरुस्ती न झाल्यास पुढील काळात आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
