वरोरा येथे महावितरण कार्यालयात लाईनमन दिवस उत्साहात साजरा

लाखो आणि हजारो घरा घरात विद्युत पोहोचवणारे हात म्हणजेच लाईनमन होय महावितरणचे कर्मचारी वर्षातील तीन ऋतू मध्ये सुद्धा त्यांची नौकरी व्यस्त असते अनेक अडचणींना सामोरे ठाकत विद्युत ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत कसा राहील हेच एक मात्र ध्येय त्यांच्यासमोर असते कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत विद्युत येण्यास थोडासा जरी उशीर झाला तरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये अनेक जण फोन लाऊन लाईन कधी येणार याची विचारणा होते पण ज्यावेळेस जिथे लाईन नादुरुस्त झाली आहे तो दुरुस्तीचा खांब शोधण्यासाठी तीन ते चार किलोमीटर फिरावे लागते त्यावेळेस तो फॉल्ट सापडतो अशा अडचनीत सुद्धा ग्राहकांनी समजून घ्यायला हव्या सगळे काही कौटुंबिक अडचणीला बाजूला सारून ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत कसा होईल हे प्राधान्याने बघणाऱ्या लाईनमन बद्दल आजचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “लाईनमन दिवस” साजरा करण्यात आला. राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग वरोरा यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून अधिक्षक अभियंता मा. सौ .संध्या चिवंडे मॅडम ,चंद्रपूर ,मुख्य कार्यकारी अभियंता घडोले साहेब,उप कार्यकारी अभियंता भोयर साहेब ,उप कार्यकारी अभियंता कोराने साहेब, लालसरे साहेब ,तुरानकर साहेब,मेश्राम साहेब ,पिदूरकर साहेब ,मस्की साहेब जुमडे साहेब व वरोरा विभागातील टेक्निकल व नॉन टेक्निकल विभागातील कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही प्रकारचे भौतिक सुख उपभोगायचे असल्यास विद्युत शिवाय पर्याय नाही . गिरणीतील दळण दळण्यापासून ते बोरवेल मधून पाणी बाहेर खेचण्यासाठी विद्युतची नितांत गरज असते. तर शेती ओलीत करावयाचे असल्यास विद्युत प्रवाह शिवाय पर्याय नसतो या सर्वामागे असते ती असंख्य कामगारांची व तंत्रज्ञांची भल्ली मोठी राबत असलेली यंत्रणा व या सर्व महाकाय बाबीवर नियंत्रण ठेवणारे व २४ तास अविरत वीजपुरवठा करण्यासाठी अहोरात्र वेगाने काम करणारी कामगार यंत्रणा विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी. हाच कर्मचारी सर्वांच्या घरात,कार्यालयात लख प्रकाश कसा राहील हाच त्यांचा उद्देश आणि आज त्यांच्या प्रती त्यांनी दिलेला सेवाभावाची आठवण म्हणून लाईनमन दिवस वरोरा येथे आयोजित करून यथोचित गौरव करण्यात आला.