
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शनाच्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.व विद्यार्थांना प्रेरणादायी मार्गदर्शन प्रमुख वक्ते मा.डॉ.प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ, प्रमुख मार्गदर्शक मा. प्रविण देशमुख प्राध्यापक शिवशक्ती महाविद्यालय कळंब, प्रमुख पाहुणे म्हणुन मा.आकाश मोडक सहसंपादक एकलव्य फाऊडेशन, यवतमाळ, यांचे वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा तसेच यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना आले . यावेळी राळेगाव तालुक्यातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांचे पालक वर्ग तसेच शिक्षकवृंद तसेच राळेगाव तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या संत्रात निर्भय बनो, तर्फे अँड .कीशोर मांडवकर, अँड,सौ.सिमाताई तेलंगे, अँड वैभव पंडित यांच्याकडुन निर्भय बनो चे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव, क्रांतीकारी शहीद भगतसिंग संघटन, निर्भय बनो , नवोदय क्रिडा मंडळ राळेगाव, व इतर युवा मंडळ राळेगाव यांनी आजोजित केला होता.
