
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव, वडकी, कळंब येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.361बी हा राळेगांव शहरातुन भर रहदारीच्या दोन कि.मी. अंतरावरून जातो. सर्व सोई सुविधा देवू म्हणुन हा सिमेंट रस्ता झाला. पण रत्याच्या मधोमध लावलेले 1 वर्षापासुन स्ट्रिीट लाईट सदैव बंद असतात. आठवडयाआधी याच रस्त्यावर दोन कुटुंबाना दुर्घटनेत आपले जीव गमवावे लागले. वडकी ते राळेगांव, कळंब रोडवर दररोज छोटे मोठे अपघात होतात. याची वेगवेगळी कारणे आहेत. पण रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गा नं.361 बी वर भरधाव वेगाने वाहने जाणे येणे सुरू राहते. अपघात होवू नये यासाठी हे दोन कि.मी. वर स्ट्रीट लाईट निदान रात्रीतरी सुरू हवी.या सोबतच महामार्गवरील काटेरी झुडपे ही महत्वाची समस्या घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके यांनी निवेदन दिले.
राज्य महामार्ग क्र.361बी वर रोडच्या दोन्ही बाजुने मोठ-मोठी काटेरी झाडे झुडुपामुळे ये जा करिता खुप मोठया प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावर समोरून येणारे वाहने वाहनचालकांना दिसत नाही म्हणुन मोठे अपघात होत आहे.
दोन्ही गंभीर विषयाची त्वरीत दखल घेवून स्ट्रीट लाईट नेहमी रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याबाबत संबधीत ठेकेदार दिलीप बिल्डकॉन यांना आदेश दयावे तसेच झाडे झुडुपे महामार्गाच्या दोन्ही बाजुने मधात येत आहे ती त्वरीत तोडण्याबाबत आदेश दयावे जेणे करून अपघाताची मालीका थांबवेल व वाहनधारकांचे जीव वाचेल. त्वरीत निवेदनाची दखल घेवून कार्यवाही करावी अशी मागणी दिलीप कन्नाके तालुका अध्यक्ष राष्टवादी काॅग्रेस पार्टी राळेगाव यांनी केली. तालुक्यातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सा. आत्मबल संपादक, न. प. बांधकाम सभापती मंगेश राऊत यांचे सह अनेकांनी या बाबत तातडीने कारवाई करण्याची भावना व्यक्त केली आहे.
