गुरुदेव क्रांतीज्योती यात्रेचे केळापुरला स्वागत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत केन्द्रीय प्रचार कार्यालयाची श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रा केळापुर येथे आली असता, तिचे भव्य प्रमाणात स्वागत करण्यात आले. क्रांतीज्योत योत्रेचे प्रमुख सुशिल महाराज बोरुडे, विठ्ठलराव सावरकर, प्रा अशोक चरडे, एकनाथ गाउने, पद्माकर ठाकरे, जयसिंग चव्हाण, राजेन्द्र राउत, ओम हिमसे, अमन इंगोले, मुलचंद तुपट, काळपुरे सर आदि पालखी सोबत केळापुरला आले होते. पालखीतील सर्वांनी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवुन पुढील प्रवास सुरु केला. केळापुर तालुक्याचे सर्वाधिकारी विलास गोडे यांच्या घरी रथयात्रा नेण्यात आली. यावेळी विठ्ठलराव सावरकर, प्रा अशोक चरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रवचन व स्नेह भोजनाने कार्यक्रमाची करण्यात कार्यक्रमाच्या सांगता आली. यशस्वीतेकरीता डॉ संजय तोडासे, अशोक भेंडाळे, अॅड खैरकार, विलास गोडे, विष्णुपंत रामगिरवार, राजेन्द्रं दहापुते, प्रभाकर ठाकरे, विलास हातगांवकर, ईश्वर महाराज मासटवार, किसन शेडमाके, संतोष शेंडे, अतुल राठोड, काशिनाथ पारशिवे आदिसह अनेकांनी परिश्रम घेतले.