
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील भांब येथे न्यु एकता क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित कबड्डी स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण ३० संघांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेतील विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे—
प्रथम पारितोषिक (₹21,000)
डोंगरगाव – सुर्योदय क्रीडा मंडळ
द्वितीय पारितोषिक (₹15,000)
सोयटी – छत्रपती क्रीडा मंडळ
तृतीय पारितोषिक (₹10,000)
डोंगरगाव – जय बजरंग क्रीडा मंडळ
चतुर्थ पारितोषिक (₹7,000)
भांब – न्यु एकता क्रीडा मंडळ
स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण सोहळा
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्य नितीन झाडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून चितरंजनदादा कोल्हे, प्रशांत भाऊ तायडे, विजय भाऊ धानोरकर, निखील राऊत, ग्रामविकास अधिकारी जगदिश मडावी, तसेच वसंत जुमनाके, कैलास सिडाम, राजु पेंदोर, चेतन येरेकार, मनोहर सिडाम, नामदेव वाकडे, गणेश जाभुळकर, शंकर वाकडे, विजय किन्नाके, राजेंद्र डंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट अंपायर म्हणून गणेश जाभुळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्तिक वाकडे, कुणाल दाते, नयन मरापे, दादु ऊईके, पवन चुडुके, शेवन धोबे, दिलीप बर्डे, नितीन सिडाम, वैभव धोटे, प्रशांत कुमरे, राहुल सिडाम, सतिश सिडाम, प्रमोद कोवे, कपील जुमनाके, अक्षय पेंदोर, राजु चुडुके, आदित्य कुमरे, करून पोटे, चंदु गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.
ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा नितीन भाऊ झाडे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीपणे पार पडली.
