
सहसंपादक : रामभाऊ भोयर
समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव अंतर्गत 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथून प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.क्रांती चौक राळेगाव येथे उपस्थित नागरिकांना समावेशित शिक्षणाबद्दल जाणीवजागृती करण्यात आली.तसेच गट संसाधन केंद्र पं. स. राळेगाव येथे अंगणवाडी ताई व पालक यांच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी मा.श्री.नवनाथ लहाने,साहेब.,प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.निलेश दाभाडे,साहेब., तथा प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राळेगाव केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती डॉ. कल्पना डवले मॅडम,यांची उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी, पं. स. राळेगाव यांनी दिव्यांग विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा व इतर लाभाविषयीं उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच प्रशस्त अँप व इतर प्रशासकीय बाबी संदर्भात प्रेरक मार्गदर्शन केले.तसेच मा.श्री. निलेश दाभाडे,शिक्षण विस्तार अधिकारी यांनी उपस्थित अंगणवाडी ताई आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून समस्यात्मक प्रश्नांचे समाधान व उपचारात्मक मार्गदर्शन केले,तसेच डॉ. कल्पना डवले मॅडम यांनी विध्यार्थ्यांना disable न समजता differently able समजावे असे नमूद करून दिव्यांग विध्यार्थ्यांच्या पालकांचे मनोगत उंचावले..
…. उपस्थित विशेष शिक्षकांनी प्रशस्त ऍप,बहुदिव्यांग अध्यापन शैली, दिव्यांग विध्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी, दिव्यांग विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा,आरोग्य विषयक जाणीव इत्यादी विषयी मार्गदर्शन केले..
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री विनोद मेंढे, विशेष शिक्षक,वरध व प्रास्ताविक श्री.राहुल पोटरकर, विशेष शिक्षक राळेगाव, यांनी केले.तसेच उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यां च्या पालकांना प्रशस्त अँप विषयी माहिती श्री. दिपेश शेंडे विशेष शिक्षक, धानोरा, श्री. सचिन वेरूळकर,विशेष शिक्षक वाढोणा बा.यांनी दिली, तसेच कु माधुरी धामंदे, विशेष शिक्षक, अंतरगाव व श्री. चंद्रकांत मडावी, विशेष शिक्षक झाडगाव यांनी दिव्यांग विध्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधेबाबत माहिती दिली व उपस्थित मान्यवर,दिव्यांग विद्यार्थी त्यांचे पालक व अंगणवाडी सेविका यांचे आभार श्री. दीपक सोळंके विशेष शिक्षक जळका यांनी मानले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपेश शेंडे, विनोद मेंढे,राहुल पोटरकर, दिपक सोळंके, सचिन वेरूळकर,चंद्रकांत मडावी, कु. माधुरी धामंदे यांनी विशेष प्रयत्न केले व गट संसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
