येवती (डोमाघाट ) येथे सगुणा रुरल फाउंडेशन द्वारा आयोजित S.R.T.शेतीचे जनक कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांची शेतीकरी संवाद,व मार्गदर्शन बैठक संपन्न.

येवती (डोमाघाट) येथे दिनांक २३-१-२५ रोज गुरुवारला सकाळी ११ वाजता सती सोनामाता सांस्कृतिक भवन मध्ये सगुणा रुरल फाउंडेशन द्वारा आयोजित S.R.T.शेतीचे जनक कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांचा मराठवाडा विदर्भ दौरा कार्यक्रम रेवती येथे शेतकरी शेतकरी संवाद व मार्गदर्शन बैठक आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी शेतकरी बांधवांना एस.आर.टि .पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनात होणारी वाढ ,व लागणारे खर्च यावर योग्य मार्गदर्शन केले. तसेच S.R.T कृषीमित्र उमेश पोहदरे यांच्या शेतात जाऊन कपाशी ,चना पिकांची पाहणी केली . व शेतकऱ्यांची चर्चा करण्यात आली. यावेळी S.R.T कृषमित्र. उमेश पोहदरे येवती मो.नं. ९७६७५१५४१० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पण करण्यात आले.
यावेळी येवती परीसरातील तसेच राळेगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पोहदरे यांनी केले