
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षे कडे असलेला कल लक्षात घेऊन व त्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करावयास प्रोस्ताहन मिसळावे या उद्देशाने इंदिरा गांधी कला महाविद्यालयाद्वारे राळेगाव तालुक्यामधील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता नुकतीच ‘तालुका स्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा -२०२६’ आयोजित केली होती. या परीक्षे मध्ये एकूण ०७ कनिष्ठ महाविद्यालयामधील ४८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ प्रजासत्ताक दिनाचे दिवशी इंदिरा गांधी कला महाविद्याल्यामध्ये मा. प्रा. वसंतराव पुरके माजी शिक्षणमंत्री, यांचे हस्ते पार पडला. या प्रसंगी मा. पुरके सरांनी दर वर्षी अश्या प्रकारची परीक्षा आयोजित करावी जेणे करून आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करावयास प्रोस्ताहन मिळेल असे मत व्यक्त केले.
या परीक्षे मध्ये प्रथम क्रमांक इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील १२ वीचा विद्यार्थी गुरुदास सुरकार याने मिळविला असून याला मा. वसंतराव पुरके सर यांचे कडून रु. ३०००/- रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर द्वित्तीय बक्षीस स्व. खुशालराव मानकर विद्यालय, सावरखेडा विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तृप्ती अरुण चाहरे हिने प्राप्त केला तिला विनय मेडिकल स्टोर्स कडून मा. विनयभाऊ मुनोत यांचे तर्फे रु. २०००/- रोख , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तृनीय क्रमांक इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील विद्यार्थी अश्व्जीत लोहवे याने प्राप्त केला त्याला मा. झोटिंग ब्रदर्स, मंगलमूर्ती इलेक्ट्रोनिक्स अंड फर्निचर राळेगाव, यांचे तर्फे रु. १०००/- बक्षीस दिले तर मनीष राठोड लाखाजी महाराज विद्यालय, झाडगाव, कु. संस्कृती भगत मार्कंडेया जुनिअर कोलेज, राळेगाव व पियुष प्रमोदराव लांडगे उच्च माध्यमिक आश्रमशाळा , सावरखेडा यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली . या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.वाय. शेख , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. निमसटकर तसेच तालुका स्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ चे समन्वयक डॉ. व्ही. एल. बरडे उपस्थित होते.
