भाटेगाव उमरी येथील तलाठी श्रीमती बडूरे गत तीन महिन्यापासून बेपत्ता – सरपंचांनी दिली तक्रार

प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजे भाटेगाव (उमरी) येथील तलाठी श्रीमती बोरुडे मागील तीन महिन्यापासून सज्जावर उपस्थित राहत नसून तलाठी सज्जा कार्यालयाचा कारभार नांदेड येथे राहून पाहत आहेत. यामुळे खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोना पार्श्वभूमीच्या महसूल विभागाच्या निर्देशानुसार तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांना सज्जावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत; परंतु हे सर्व आदेश संबंधित कर्मचारी यांनी धाब्यावर बसवले आहेत. भाटेगाव येथील तलाठी यांना सज्जावर उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच कमलबाई शिंदे तसेच उपसरपंच यांची स्वाक्षरी आहे. समस्त गावकऱ्यांच्या वतीने सतत गैरहजर राहणाऱ्या त्या महिला तलाठी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.