
सहसंपादक: रामभाऊ भोयर
डॉ य.मो.दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्ट च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत किशोरवयीन मुला मुलींचे समुपदेशन सत्र सोनामाता हायस्कूल चहांद येथे आयोजित करण्यात आले, राळेगाव पंचायत समितीचे डॉक्टर श्रीकांत बहाड व डॉक्टर तृप्ती डुकरे डॉक्टर सविता सिडाम यांनी किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीरामध्ये होत असलेले अंतर्गत बदल व त्यांनी या अवस्थेमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. मुलींसाठी महिला डॉक्टर सविता सिडाम,डॉ. तृप्ती डुकरे यांनी किशोरवयीन वयामध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मुलांना किशोरवयीन वयामध्ये घ्यावयाची आरोग्यविषयक काळजी याबद्दल डॉक्टर श्रीकांत बहाड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय चिव्हाणे सर, कांबळे सर, दांडेकर सर ,गोवारदिपे मॅडम, शिवणकर सर, सोनवणे सर, राऊत सर, या सर्वांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक चेतना जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होईल
