
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय विज्ञान उत्सव अंतर्गत विज्ञान पोस्टर स्पर्धा,विज्ञान मॉडेल स्पर्धा,विज्ञान चित्रकला स्पर्धा, विज्ञान नाटिका स्पर्धेचे आयोजन आज दि. 3/1/2026 रोजी लोकनायक बापूजी अणे विद्यालय यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले. त्यात जिल्यातील अनेक शाळेने सहभाग नोंदविला. मार्कंडेय पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान पोस्टर स्पर्धेत प्रथम, विज्ञान मॉडेल स्पर्धेत प्रथम, तसेच चित्रकला स्पर्धेत सुद्धा प्रथम व नाटिका स्पर्धेत द्वितीय येऊन विध्यार्थ्यानी नाव लौकिक केले. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश अंतर्गत दरवर्षी अनेक स्पर्धेचे केल्या जातात त्यात विज्ञान विषयक अध्ययवत ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते व त्या अंतर्गत विज्ञान विषयक रुची व आवड निर्माण होऊन स्पर्धात्मक विकास घडून येतो. स्पर्धेत सहभागी शाळेचे विद्यार्थी कु. अनन्या उत्तरवार, साई उंबरकर, पारितोष आगलावे, कु. तनया चांदोरे,कु. मृणाली त्रिपदवार, कु. यादवी आगलावे, पुष्कर राऊत, अयाज अली सय्यद, कु लावण्या खेकारे कु. इशिका पाटील, कु श्रुतिका पटेलपैक,कु. श्रावणी होरे, कु. मनस्वी कोल्हे, कु. आराध्या येणोरकर,ज्ञानेश्वरी राजकोल्हे, कु. स्नेहा सोनाळे, सिद्धी येपारी, कु.रुचिता गाडगे, कु अक्षरा चौधरी, कु प्रियल पाटील,कु. अमृता वाघमारे,कु. आशिता जयस्वाल, कु कृष्णाली मदणकर यांनी घेतला सोबतच शाळेचे शिक्षक श्री. निखिलकुमार चाटलेवाड, सौं. अनामिका खंडाळकर,श्री.अरविंद बटाले, श्री. मनोज भगत, श्री. प्राजक्त वाकेकर आदींचे मार्गर्दन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शीतल बल्लेवार व संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार व विज्ञान भारती विदर्भ प्रमुख सौं. ताटे मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
