
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
यवतमाळ
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मानवाधिकार सहायता संघ (भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस एस भारत (सोनू सिंघ) यांच्या आदेशानुसार तसेच रवी धारणे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र, भारत डवरे प्रदेश सचिव महाराष्ट्र. रोशन मुडे (पाटील) जिल्हा प्रमुख यवतमाळ यांनी सचिन सुखदेवराव पुरी (बाभूळगाव) यांची जिल्हा मीडिया प्रभारी या पदावर नियुक्ती केली आहे. मानवाधिकार सहायता संघ भारत हे मानवाच्या अधिकाराचा रक्षणार्थ तसेच भारत सरकार यांच्या नियमाला अनुसरून संपूर्ण भारतात तसेच भारताबाहेर काम करणारी एकमेव संस्था आहे. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स साठी असून या संस्थेवर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र शासनाचे आहे. संस्थेच्या ध्येय धोरणांचा प्रचार व प्रसार करून समाजोपयोगी कार्य करण्याची जबाबदारी सचिन पुरी यांचेवर आहे. ते आपल्या निवडीचे श्रेय मानवाधिकार सहायता संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्व वरिष्ठांना देतात.
