
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगावच्या वतीने ११ व १२ जानेवारी रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुरुष दौड स्पर्धा, नामामि गंगे एकपात्री नाट्यप्रयोग व भव्य स्वत्तदान शिबीर होणार आहे. तालुक्यातील नागरीकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
दिनांक ११ जानेवारी सकाळी ७ वाजता क्रांतीचौक राळेगांव येथून पुरुष दौड स्पर्धेला सुरुवात होईल, यात प्रथम ३१०० रु., द्वितीय २१०० रु., तृतीय १५०० रु. च चर्तुथ १००० रु. चे बक्षीस विजेत्यांना देण्यात येईल, याच
दिवशी सायं. ६ वाजता नगर पंचायत राळेगांव समोरील मैदानावर नमामि गंगे हा एकपात्री नाट्य प्रयोग होईल. दि. १२ जानेवारी २०२४ ला सकाळी १० ते दुपारी ३ वाजता पर्यंत भव्य रक्तदान शिबीर होणार आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद विचारमंच द्वारे करण्यात आले आहे.
