रासायनिक खत लिंकिंग वर भडकले जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी अनेक कार्यकर्त्यांशी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

रासायनिक खत लिंकिंग वर भडकले जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी अनेक कार्यकर्त्यांशी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना निवेदन दिले या निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले की तालुक्यात होणारा रासायनिक खत लिंकिंग चा काळाबाजार रोखण्यासाठी आदेश देण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू अशी भूमिका घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचा जणू वसा घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी पुढाकार घेतला शेतकऱ्यांच्या समस्या असंख्य असतानी सुद्धा रासायनिक खत लिंकिंग यासारखा प्रकार उघडकीस आला असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन जिल्हाध्यक्ष यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे जिल्ह्यातील बरेचसे कृषी केंद्र चालक व डीलर यांनी जणू धडाकाच धरला खतेलिंकिंग असा प्रकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना समाधानाने शेती पेरणी केल्यानंतर निसर्गांना व्यवस्थित साथ देऊन त्यांचे बियाणे चांगले निघाले असून खतांसाठी अहक त्रास होतोय शेतकरी रासायनिक खताच्या मागे आगावचे वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच पाच किलोचे खाते घेऊन आपल्या पैशाची गुंतवणूक कशाला करेल या जिल्ह्यातील अडचणीत सापडलेला शेतकरी हे कपाशीसाठी किंवा अन्य पिकांसाठी रासायनिक खते देण्याचा विचार करेल की बाजारातल्या ह्या क* कंपन्यांचं पिल्लू घेतील त्या किल्ल्याची किंमत हजार ते पंधराशे रुपये पर्यंत असून तेवढ्या पैशात डिए पी सारखी एक बॅग होतो कशासाठी आगाऊ कंपन्यांचं पिल्लू घेऊन आपला पैसा वेस्ट करतील ह्या गोष्टीवर उपयोगी अधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर यांनी तातडीने निवेदन दिले असता यावर सात दिवसाच्या आत तोडगा काढला तर ठीक आहे अन्यथा आम्ही मनसेतर्फे एकतर आंदोलन करू किंवा जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रावर जाऊन मनसेतर्फे धडा टाकून कृषी केंद्र चालकांना धडा शिकवू अशा शब्दात लिखित निवेदन देऊन बजावले शेतकऱ्यांना नेहमीसाठी ह्या रासायनिक खताच्या कंपन्या औषधाच्या कंपनी आगावचे पैसे घेऊन त्रस्त करत आहे अशा या बरेचसे प्रकार होत असल्यामुळे याकडे कृषी अधिकारी किंवा कलेक्टर्स साहेबांनी लक्ष नोंदणी गरजेचे आहे जर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर मनसे कायदा हातात घेऊन याकडे तातडीने लक्ष देईल याची नोंद प्रशासनानं घ्यावी यापासून कोणत्याही पडसाद उमटल्यास जबाबदार प्रशासन राहील अन्यथा खतासारखा लिंकिंग काळाबाजार रोखावा व ज्या कृषी केंद्र या पद्धतीचे व्यवहार होत असल्यास त्या कृषी केंद्र मालकावर मोठ्यात मोठा गुन्हा दाखल करून त्यांना सजा द्यावी व त्यांची दुकाने सील करून देण्यात यावं कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या व अडचणी सापडलेला शेतकरी तोपर्यंत समाधानी होणार नाही जोपर्यंत गुन्हेगारांना सजा होणार नाही अशा प्रकारे निवेदन देण्यात आले आहे त्याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर यांच्या नेतृत्वात शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ भोमले तालुका अध्यक्ष पवन तडस तालुका उपाध्यक्ष सोनू भोसले शहर उपाध्यक्ष संकेत वंजारी राहुल डावले व शेतकरी वर्ग उपस्थित होते