जिल्हाधिकारी लोकशाही दिनात प्रधानमंत्री आवास योजना शहरी पूर्ण करण्याची लाभार्थी कुटुंबाची मागणी

सहसंपादक:रामभाऊ भोयर

प्रधानमंत्री आवास योजना शहरी राळेगाव नगरपंचायत डीपी आर दोन मधील सरकारी जागेवरील पात्र लाभार्थी कुटुंबाच्या घराची मोजणी सर्वेक्षण झालेल्या कुटुंबाच्या घराचे मालकी सिटी सर्वेक्षण प्रमाणपत्र उतारे विना विलंब लाभार्थी कुटुंबांना देण्यात यावे नगरपंचायत डी पी आर दोन मधीलच तालुका उपाध्यक्ष भूमी अभिलेख त्यांच्या सर्वेक्षण यादीत नावे नसलेल्या परंतु पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंबाचे ताबडतोब सर्वेक्षण करण्यात यावे नगरपंचायत डी पी आर तीन मधील 452 लाभार्थी कुटुंबाच्या घराची मोजणी सर्वेक्षण सुद्धा प्राधान्याने करावे सी एल टी सी इंजिनियर ची नेमणूक लवकरात लवकर करावी डी पी आर एक मधील घराचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थी कुटुंबांना अनुदानाचा तिसरा चौथा हप्ता देण्यात यावा इत्यादी मागणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी कुटुंबांनी धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड साहेबांनी त्यांच्या दालनात नगरपालिका प्रशासन अधिकारी निलेश जाधव यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यास सहकार्य केले तर नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्या कक्षात मुख्याधिकारी नगरपंचायत राळेगाव अनुप अग्रवाल यांच्यासोबत लाभार्थी कुटुंबांनी मागण्यांचे निवेदन देऊन जिल्हाधिकारी प्रशासनावर दबाव वाढविला आहे चर्चेमध्ये शंकर गायधने भानुदास महाजन सीमा एडसकर रिता बेंडे मंदाकलांद्रे मंदा डडमल संतोष झुंजुर्कार खुशाल ढाले राजू मुके हरिभाऊ ठाकरे रामचंद्र राऊत मारुती फरकाडे जय नुम निसा शेख सविता शिंदे मनीषा गजर लक्षमी दीपक गजर शांताबाई टेकाम चंद्रभागा हरिदास नगराळे आशा पेंदोर दुर्गा खापर्डे लक्ष्मी टोळे शालू टो ळे सुरेखा आत्राम वनिता भोंगाडे इत्यादी लाभार्थी कुटुंबांनी चर्चेत सहभाग घेतला व दीडशे लाभार्थी कुटुंबाच्या स्वाक्षरीचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले