सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ राळेगाव यांचे विद्यमाने दिनांक एक आक्टोंबर 20 25 रोजी ग्रामीण विकास प्रकल्प राळेगाव येथे ज्येष्ठ नागरिकाचा आरोग्य विषयक व कायदेविषयक मेळावा घेण्यात आलेला आहे या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून श्री मेघश्याम विनायकराव चांदे तर उद्घाटक म्हणून श्री भूपेंद्र धनजीभाई कारिया म्हणून उपस्थित होते
पहिले प्रथम उपस्थित असलेल्या मान्यवरानी दीप प्रज्वलित करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगेबाबा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारत माता इत्यादी फोटोचे पूजन करण्यात आले
तदनंतर मृत सदस्य श्री मोरेश्वर शामरावजी लांबाडे व श्रीमती शोभाताई जगन राव कोल्हे यांना सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व ज्येष्ठांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे
त्यानंतर प्रमुख मान्यवराचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचे मंडळाचे वतीने स्वागत करण्यात आले नंतर कुमारी रुची उर्फ गारगी राकेश राऊळकर यांनी हमे इतनी शक्ती हमे देना दाता हे गीत गाऊन सर्व मान्यवरांना व ज्येष्ठांना मंत्रमुग्ध केलेत श्री भूपेंद्र धनजीभाई कार्य यांनी कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन जाहीर झाल्याचे करून ज्येष्ठांना ज्येष्ठांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एडवोकेट सौ रोशनी कामडी कंसात वानोडे यांनी जेष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन केले तर कुमारी डॉक्टर निवेदिता ठाकरे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय राळेगाव यांनी आरोग्य विषयक ज्येष्ठांना मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकरराव गेडाम यांनी संस्थेबद्दल संपूर्ण माहिती उपस्थित असलेल्या ज्येष्ठ सदस्यांना देण्यात आली तसेच संस्थेचा मागील व चालू वर्षाचा जमा जमाखर्चाचा संपूर्ण लेखाजोगा सभेमध्ये सादर करण्यात आला सदर कार्यक्रमात दहा ज्येष्ठांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते व मंडळाचे जेष्ठ संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तदनंतर खैरी येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष श्री वसंतराव बापूराव जी मते यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठांना भोजनाची संपूर्ण व्यवस्था करणारे श्री धनंजय दशरथजी शेजेकर यांना मान्यवराच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे संचालन श्री निखिल राऊत यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव गेडाम यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मेघ शाम विनायकराव चांदे यांनी उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले काम कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री राजेंद्र कोल्हे यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री पुरुषोत्तम ओंकार श्री कृष्णराव राऊळकर श्री जानरावजी राम गडे श्री भाऊरावजी ठाकरे श्री सुरेंद्र जी ताठे श्री नंदकुमार टिपणवार श्री राजेंद्रजी कोल्हे श्री प्रभाकरराव चवरे श्री भगवंतराव धनरे सौ अंजलीताई महल्ले श्रीमती छायाताई सुरेश राऊत सौ पुष्पाताई विजयराव मडावी तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते शंकरराव तोडाशे विठ्ठलराव वाघमारे विद्याधर निशाने गुलाबराव चांदेकर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले शेवटी सदर कार्यक्रमात राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मंडळाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांना व मान्यवर मंडळींना जेवणाचा आस्वाद घेण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकरराव गेडाम व सर्व संचालकांनी विनंती केली
