
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
शरद अंबाडेरे रा. तेजणी याची पत्नी दोन वर्षे पासून टी बी चे आजाराने ग्रस्त असून ती माहेरी मौ जा महाकाळ, जिल्हा वर्धा येथे राहत आहे. दिनांक 22/8/21 चे रात्री 8/30वा. शरद अंबाडेरे यांचा सोयरा किसना नेहारे रा. महाकाळ याने आपले सोबत 8ते 10 मित्रनातेवाईक सोबत घेऊन तेजणी येथे येऊन गैरकायद्याची मंडळी जम वून व दंगा गर्दी करून फिर्यादी शरद आंबेडरे चे आईने जादू टोणा केल्याचा संशय घेऊन शरद आंबेदेरे व त्याचा भाचा अनिल बोटरे यास हाता बुक्क्याने मारहाण करून धमकी दिल्याने किसणा नेहारें, सूरज नागो से, अक्षय वातमोडे व इतर 10 लोकं रा. महाकाळ यांचे विरुद्ध कलम 143,147,149,323,448,506 भा द वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. व अधिक तपास राळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार करीत आहे.
