
वरो-यात आज पासून वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य ज्युनियर गट आंतरविभागीय डब्ल्यू एस एफ चषक स्पर्धा सुरू होत आहेत
या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री बाळू धानोरकर यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ प्रतिभा धानोरकर या राहणार आहे. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री देवराव भोंगळे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर), अहेतेश्याम अली (माजी नगराध्यक्ष नगरपरिषद वरोरा), श्री आयुष नोपाणी (IPS) उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा हे राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील (अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोडा)हे असून प्रमुख उपस्थिती म्हणून अविनाश पुंड (जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर), श्रीकृष्ण घड्याळपाटील (उपाध्यक्ष लोकशिक्षण संस्था वरोडा), विलास टिपले (माजी नगराध्यक्ष नगरपरिषद वरोरा), रमेश राजुरकर( प्रसिद्ध उद्योजक वरोरा), राजेंद्र चिकटे (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा), डॉ. कपिल गेडाम, न्यूरोलॉजिस्ट चंद्रपूर, श्री अनंत बोबडे साहेब (माजी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर), सौ सुनीता काकडे (माजी नगरसेविका नगरपरिषद वरोरा) यांची प्रमुख उपस्थिती असणार असून विशेष उपस्थिती म्हणून अविनाश मेश्राम (ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव बु), श्री गणेश पावडे (संचालक दिशा एज्युकेशन पॉईंट वरोरा), यांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी ५:३० वाजता लोकमान्य महाविद्यालय वरोरा येथे स्वर्गीय मनोहर भाऊ पाटील क्रीडा परिसरात संपन्न होत आहे.
या स्पर्धेत विजेत्या मुलांच्या संघाला स्वर्गीय संजय जीवतोडे स्मृती चषक श्रीमती स्मिताताई जीवतोडे यांचे कडून, उपविजेत्या संघाला स्वर्गीय बापूरावजी काळे माजी नगराध्यक्ष यांच्या स्मरणार्थ चषक श्री अनिल काळे यांच्याकडून, तृतीय पुरस्कार चषक स्वर्गीय कृषी पिदुरकर यांचे स्मरणार्थ पीदुरकर बंधू, वणी यांचेकडून.
मुलींच्या गटात विजेता संघाला चषक स्वर्गीय गजाननजी गेडाम यांचे स्मरणार्थ चषक डॉक्टर कपिल गेडाम यांच्याकडून, उपविजेत्या मुलीच्या संघाला चषक स्वर्गीय देवरावजी नरोले यांच्या स्मरणार्थ श्री गोपाल नरोले यांचेकडून, तृतीय पुरस्कार चषक स्वर्गीय संजय राणे स्मरणार्थ विलेपार्ले व दहिसर मित्र मंडळ यांचे तर्फे.
स्पर्धेच्या निमित्ताने शहरात खेळाडूंची प्रभात फेरी निघणार असून स्पर्धेच्या निमित्ताने शहरात 250 खेळाडू व पदाधिकारी दाखल झालेले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता लोकशिक्षण संस्था व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा परिश्रम घेत आहे . महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेतर्फे विशेष मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्ताने मिळत आहे.
