सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे “बालक दिन “साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

श्री सत्यसाई बहुद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडकी तालुका राळेगाव येथे भारताचे प्रथम प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरू यांची १३५ वी जयंती बालक दिन म्हणून विविध कार्यक्रमांनी नुकतीच साजरी करण्यात आली.

संस्थाध्यक्ष मेजर रणधीरसिंह दुहन व सचिव सत्यवानसिंह दुहन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य सचिन ठमके (Resource Person Of CBSE) यांनी सदर जयंती कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन व हार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य सचिन ठमके यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण भूमिका,राष्ट्रीय विकासात अमूल्य योगदान तसेच त्यांचे बालकांवरील नितांत प्रेम या विषयावर उपस्थित विध्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने कऱण्यात आली.