
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
यवतमाळ येथे क्रांतीविर बाबूराव शेडमाके प्रबोधिनी राळेगांव तर्फे ३६ व्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.त्या संघाचे प्रतिनिधित्व करणार्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ येथील तिलक धनराजी पुरके, या खेळाडूने प्रतिनिधित्व केले. त्या संघाने गुजरात येथेझालेल्या.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले.तिलक पुरके हा आदिवासी समाजातील असून त्याने आदिवासी समाजामध्ये तसेच ग्रामीण भागात हा खेळ पोहचवण्याचे दृष्टीने सहकार्य करतो अशी प्रतिक्रिया दिली.जने करून आदिवासी बहुल भागात हा खेळ पाहचेल व ग्रामीण भागात जसा क्रिकेट हा खेळ पोहचला तसाच या अमेरिकन खेळचा प्रसार ग्रामीण भागात सुध्दा होईल अशी आशा व्यक्त केली.यावेळी बामसेफचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मा.अरविंद केराम साहेब,तसेच मा.मडावी सर,यवतमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच श्री.किरण अन्नाके सर, यांनी तिलकच्या पुढील आयुष्यात क्रीडा स्पर्धेत मोठे यश मिळो व ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करावे असे मत व्यक्त केले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन तुमराम सर, यांनी केले .तर आभार श्री. धनराज पुरके, यांनी मानले.यावेळी. रणजित परचाके, मधुकर पावले, मनोज वाईकर, दत्ता बोरकर, मडावी सर, तन्मय पुरके, निलिमाताई पुरके, आदि उपस्थित होते.
